निवडणूका व राजकारण म्हणजे राजकीय प्रवेशद्वार


महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत रणसंग्राम यंत्रात बंद. सरासरी ८०%च्या वर अपवाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडते. मतदार राजाने कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता पवित्र मतदानाचा हक्क बजवला. प्रशासन ते मतदान कर्मचारी यांनी आपले कर्तव्य चोख बजवले. ज्येष्ठ, शतकी पार केलेले मतदार यांनाही मतदान केंद्रावर नेऊन मतदान करवून घेतले.

घराघरांत, भावकी, गावकी यांत चूरस लावून गटतट, ईषा, तंटा चव्हाट्यावर येणे. मानपमान, हेवेदावे यातूनच ही प्रक्रिया पार पडते. आता निकालाची प्रतिक्षा. आवाज कुणाचा, गुलाल आमचा. एका मताने, चिठ्ठीने विजय खेचून आणल्यानंतर शांतता महत्त्वाची. हारजीत मोठ्या मनाने स्विकारुन आपल्या प्रपंच्याकडे लक्ष द्यावे. राजकारण ही नशा असते. महिला सरपंचाच्या कारभारात पुरुष हस्तक्षेप नसावा. सरपंच व सदस्य यांनी ग्रामविकास म्हणजे पाणी, वीज, रस्ता या मुलभूत सुविधा बरोबरच आरोग्य, घरकुले, वाचनालये, शाळा याकडे मुद्दाम लक्ष देऊन विकासाभिमुखी राज्यकारभार करावा.

ग्रामविकास हाच स्वविकास

आपलाच ग्रामस्थ ​– प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!