सात सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०७ जून २०२३ । सातारा । सातारा तालुक्यातील ड वर्गातील 7 सहकारी संस्थांचे सन 2023-2024 ते 2028-2029 या कालावधीचे संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम व प्रारुप मतदार यादी या दि. 7 जून 2023 रोजी सकाळी 11 वा. प्रसिध्द केली आहे.

ही प्रारुप यादी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था संस्था  तालुका सातारा यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. तरी सदर संस्थांच्या सभासदांनी याची नोंद घ्यावी असे शंकर पाटील, तालुका सहकारी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था संस्था, सातारा यांनी कळविले आहे.

या यादीवर ज्या सभासदांना हरकती अगर आक्षेप असतील  त्यांनी दि. 7 ते 13 जून 2023 या कालावधीमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उचीत  पुराव्यासह लेखी स्वरुपात द्यावेत. त्या नंतर निर्धारित कार्यक्रम सुरु करण्यात येईल.

निवडणूक कार्यक्रम जाहीर संस्थांची नावे पुढीलप्रमाणे  हनुमान सहकारी पाणी पुरवठा मर्या अतित, जि. सातारा, श्री. केदारेश्वर कालवा पाणी वापर संस्था लि. ठोसेघर, जय जिजाऊ महिला सहकारी संस्था, सातारा 107, औदुंबर अपार्टमेंट, रामाचा गोट, सातारा, राजमाता श्री. छ. सुमित्राराजे भोसले बचतगट बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्या, शुक्रवार पेठ, सातारा,  यशवंत स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्या, 523  करंजे पेठ, सातारा, अजिंक्यतारा सहकारी कृषी औद्योगिक ऊस तोडणी व वाहतूक संस्था मर्या, शाहूनगर-शेंद्रे, सातारा तालुका बीज उत्पादक सहकारी प्रक्रिया संस्था शिवथर.


Back to top button
Don`t copy text!