महाराष्ट्र नाभिक महामंडळांतर्गत फलटण तालुका व शहर पदाधिकारी निवडी एकमताने व बिनविरोध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१७ नोव्हेंबर २०२१ । फलटण । महाराष्ट्र नाभिक महामंडळांतर्गत फलटण तालुका व शहर पदाधिकारी निवडी एकमताने व बिनविरोध करण्यात आल्या असून स्वराज्य कुस्ती केंद्र, कोळकी चे वस्ताद पै. बाळासाहेब काशीद यांनी प्रारंभी सर्व समाज बांधवांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात बैठकीचा उद्देश स्पष्ट करुन प्रत्यक्ष काम करणारे पदाधिकारी निवडीचे आवाहन केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पै. स्वागत काशीद होते.

प्रारंभी कोरोना कालावधीत निधन झालेल्या समाजातील स्त्री पुरुषांना श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात आले.

फलटण तालुका व शहर सल्लागार समिती यावेळी सर्वांच्या संमतीने नियुक्त कऱण्यात आली त्यामध्ये पै. बाळासाहेब काशीद, विकास कर्वे, पोपटराव काशीद, गणेश कर्वे, सदाशिव कर्वे, रामदास काशीद, अभिजीत कर्वे यांचा समावेश करण्यात आला.

महाराष्ट्र नाभिक महामंडळ फलटण तालुकाध्यक्ष संजय भगवान पवार धुळदेव, कार्याध्यक्ष अक्षय उत्तम गंगतीरे फलटण, उपाध्यक्ष प्रवीण दत्तात्रय कर्वे फलटण, सचिव माऊली यादव पिंप्रद, खजिनदार सूरज देवकर कोळकी, संपर्क प्रमुख नवनाथ रणदिवे कोळकी, संघटक निलेश दळवी वाजेगाव.

महाराष्ट्र नाभिक महामंडळ फलटण शहराध्यक्ष महेश मनोहर पवार, कार्याध्यक्ष किशोर नारायण पवळ, उपाध्यक्ष अविनाश छगन साळुंखे, सचिव राजेंद्र गणेश काशीद, खजिनदार किरण कर्वे, संपर्क प्रमुख किरण मोहन राऊत, संघटक विशाल विलास कर्वे, सह संघटक दिनेश शंकर कर्वे, सोशल मीडिया प्रमुख विशाल पवार

फलटण तालुका व शहर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे यथोचित सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


Back to top button
Don`t copy text!