ओंकार गोडसे यांची कृषी पदवीधर संघटनेच्या विद्यार्थी तालुकाध्यक्ष पदी निवड



स्थैर्य, फलटण, दि. १० : कृषी पदवीधर संघटनेच्या विद्यार्थी तालुकाध्यक्ष पदी ओंकार विलास गोडसे यांची निवड करण्यात असल्याची माहिती कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष महेश कडूस-पाटील यांनी दिली.

ओंकार गोडसे हे फलटण तालुक्यातील गारपिरवाडी या गावचे सुपुत्र असून ते पश्चिम महाराष्ट्रातील विविध संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होत असतात. कृषी पदवीधर संघटना २०१२ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक उपक्रम जन आंदोलन करत असते. शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहचवण्याचे कार्य ही संघटना करत असते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!