खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर ‘युथ आयकॉन अवॉर्ड २०२४’ने सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३० जानेवारी २०२४ | फलटण |
इंडियन युथ स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यावतीने आयोजित ‘नॅशनल युथ गेम्स २०२३-२४’चे आयोजन दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी हिंदुस्तान अँटिबायोटिक्स वेल्फेअर सेंटर कॉलनी पिंपरी, पुणे येथील क्रीडा संकुलात पार पडले. या स्पर्धेकरिता संपूर्ण देशातून १५ राज्य व ९७० खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेप्रसंगी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्याची दखल घेत ‘युथ आयकॉन अवॉर्ड २०२४’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण रॉयल पॅलेस, फलटण या ठिकाणी पार पडले. इंडियन युथ स्पोर्ट्स असोसिएशनचे संस्थापक सचिव डॉ. दीपक कटारिया यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

यावेळी मंचावर फलटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य जयकुमार शिंदे, भाजपा सोशल मीडिया आयटी सेलचे जिल्हा संयोजक संजय घाडगे, भाजपचे नेते राजकुमार नाना पाटील, महादेव पोकळे, ग्राहक हित समितीचे प्रदेशाध्यक्ष संदीपकुमार जाधव, प्रकाश नांदले, राजेंद्र मदने, ऋषिकेश नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!