मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळ्याच्या वतीने प.पू. उपळेकर महाराज मंदिरात ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला विनामूल्य मार्गदर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३० जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण परिसरातील विद्यार्थी, युवक, पालक, ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठी फलटण परिसरात मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळ्याच्या वतीने प.पू. उपळेकर महाराज मंदिरात दि. ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला विनामूल्य मार्गदर्शन आयोजित केले आहे.

या मार्गदर्शनामध्ये ताणमुक्त व अर्थपूर्ण जीवनासाठी मनशक्ती ग्रंथसाहित्य प्रदर्शन, मेंदू विकासासाठी माईंड जिम अ‍ॅटिव्हीटी तसेच अल्प मूल्यात मनशक्तीच्या वैशिष्ट्यपूर्ण मानस चाचण्या असे विविध कार्यक्रम दि. ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत होणार आहेत. सविस्तर माहितीसाठी www.manashakti.org या वेबसाईटवर पाहावे. तसेच मोबाईल ९६८९१०२२८०, ९४२३८६७१३५, ९४२३८६७१६५ येथे संपर्क साधावा.

मनशक्ती प्रयोगकेंद्र ही सामाजिक संस्था लोणावळ्याला कार्यरत असून ताणमुत व अर्थपूर्ण जीवनासाठी, गर्भसंस्कारापासून मृत्यू पश्चात जीवनापर्यंत तीस प्रकारचे अभ्यास वर्ग आणि किमान साठ इलेट्रॉनिक यंत्रे व कॉम्प्युटर आधारित चाचण्या (टेस्टस्) येथे चालू असतात.

फलटण परिसरातील नागरिकांनी या मार्गदर्शनाचा फायदा घ्यावा, असे आवाहन मनशक्ती प्रयोगकेंद्राकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, डॉ. बी. आर. आंबेडकर आय. आय. टी. फलटण आणि मनशती लोणावळा यांच्या संयुत विद्यमाने ‘अशी जिंका परीक्षा’ हा स्तुत्य विनामूल्य उपक्रम मुधोजी कॉलेज, ब्रिलियंट इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि हनुमंतराव पवार हायस्कूल, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल इ. शाळेत घेण्यात आला. याचा २ हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!