ग्रामस्थांच्या पाठबळामुळे जि.प. शाळांना चांगले दिवस येतील : मालोजी देशमुख


 

सातेवाडी :  शिक्षकांचा सत्कार करताना मालोजी देशमुख, प्रतिभा भराडे आदी.( छाया : समीर तांबोळी )

स्थैर्य, कातरखटाव, दि.१९: खेड्यापाड्यातील सर्वसामान्य लोकांनी जिल्हा परिषद शाळांना पाठबळ दिले तर गावोगावच्या शाळांना पुन्हा एकदा चांगले दिवस येतील असा विश्वास वडूज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख यांनी व्यक्त केला.

सातेवाडी (ता. खटाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील डिजीटल क्लासरुमचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटशिक्षणधिकारी प्रतिभा भराडे, पुण्याचे अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, केंद्रप्रमुख सुरेखा पवार, माजी सरपंच अमोल बोटे, हणमंत बोटे, संजय काळे, उत्तमराव बोटे, प्रमोद बोटे, विक्रम बोटे, विक्रम रोमण, बाबासाहेब माने, प्रभाकर देशमुख, प्रल्हाद शिंदे ,उमेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

देशमुख म्हणाले, खासगी शाळांच्या वाढत्या आक्रमणामुळे दिवसेंदिवस जिल्हा परिषद, नगरपालिका शाळांचा दर्जा ढासळत चालला होता. मात्र खासगी शाळेमध्ये केवळ एका विशिष्ट वर्गाचीच मुले शिकू शकतात. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांसाठी शासकीय शाळाच उपयुक्त आहेत. या शाळांमध्ये शिकून अनेक विद्यार्थ्यांनी मोठे नावलौकीक मिळवलेची गावोगावी अनेक उदाहरणे आहेत.

कदर करणार्‍या लोकांमुळे गुणवत्तेत वाढ : तहसिलदार डोईफोडे

गटशिक्षणाधिकारी भराडे म्हणाल्या, सातेवाडी येथील शाळेने अलिकडच्या काळात चांगली प्रगती केली आहे. ध्येयवादी शिक्षकांबरोबर ग्रामस्थांचा चांगला सहभाग असल्यामुळे शाळेत वेगवेगळे विधायक उपक्रम राबविले जात आहेत. अश्या उपक्रमशील शाळांना शिक्षण विभागाच्या माध्यमातून चांगले सहकार्य केले जाईल. यावेळी प्रा. उत्तमराव बोटे, सुरेश बोटे, ज्ञानेश्वर बोटे, धनंजय क्षीरसागर यांची मनोगते झाली. कार्यक्रमास सुनिल बोटे, बाबासाहेब राऊत, निलेश कोळेकर, मिलींद रोमण, रविराज महामुनी, अरुण शिंदे, सौ. विजया माने, संगिता वळवे आदिंसह मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक विजय खाडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. हिंदुराव काळे यांनी आभार मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!