![]() |
सिद्धेश्वर कुरोली : गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे समवेत कुलदिप डुबल, शशिकला देशमुख, प्रभावती देशमुख, शितल देशमुख आदी. (छाया : समीर तांबोळी) |
स्थैर्य, कातरखटाव, दि.१९: खटाव तालुक्यात चांगल्या कामांची कदर करणारे काही लोक व
संस्था आहेत. त्यांच्यामुळेच गुणवत्ता वाढ व तालुक्याच्या नावलौकीकात
दिवसेंदिवस भर पडत आहे. असे मत मलकापूर (जि. बुलढाणा) येथील तहसिलदार
स्वप्नाली डोईफोडे यांनी व्यक्त केले.
सिध्देश्वर कुरोली (ता. खटाव) येथील यशवंत हो जयवंत हो आश्रमात
येरळा परिवार व खटाव तालुका सोशल फौंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या नारी
गौरव व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आगारप्रमुख
कुलदिप डुबल, म्हाडाच्या माजी संचालिका शशिकला देशमुख, माजी उपसभापती
प्रभावती देशमुख, सरपंच शितल देशमुख, प्राचार्य दिलीपराव डोईफोडे,
प्राचार्य आनंदराव नांगरे, प्रा. दिलीप भुजबळ, डॉ. शंकर जाधव, दिपकशेठ
जगदाळे, सोपानकाका दिंडीचे विणेकरी रघुनाथ फडतरे, हैबतीबाबा भजनी मंडळ
दिंडी चालक निलेश पांचाळ, देवस्थानचे विश्वस्त कुमार शेटे, गजानन कुंभार,
संतोष बोराटे यांची प्रमुख उपस्थिती होती
कु. डोईफोडे म्हणाल्या, खटाव-माण तालुके हे जरी दुष्काळी तालुके असले
तरी या ठिकाणी बुध्दीवंतांची खाण आहे. चांगल्या बुध्दीवंत विद्यार्थ्यांना
पैलू पाडण्याचे काम येथील शिक्षक ध्येयवादाने करतात. तर सामाजिक
संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक चांगल्या गोष्टीची दखल घेतली जाते. येरळा
परिवार व खटाव फौंडेशनचे उपक्रम भावी पिढीसाठी मार्गदर्शक व दिशादर्शक
आहेत.
स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
आगारप्रमुख डुबल यांनी संस्थेच्या माध्यमातून एम.पी.एस.सी.,
यु.पी.एस.सी. विद्यार्थ्यांच्यासाठी अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्याची
सुचना केली. तसेच याकामी पुस्तक व अन्य सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
संस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. आयाज मुल्ला यांनी सुत्रसंचालन केले. विजय शिंदे यांनी आभार मानले.
यावेळी रविना यादव, साक्षी इनामदार, प्रतिक काळे, गायत्री पवार,
सानिका जगताप, ज्ञानेश्वरी कोरे, आदित्य साबळे, दिया तांबोळी, ऋतुजा माळवे,
संकेत सजगणे या गुणवंत विद्यार्थी तसेच कुंभारगांव नवदुर्गा पुरस्कार
विजेत्या सुनिता महामुनी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.