अनुशेषामुळे निरा-देवघरला वरून निधी मिळत नव्हता : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यावर रामराजे म्हणाले की, भूसंपादनात निरेचा उजवा कालवा रखडला होता. शिरवळच्या तेथे दोन गावे आहेत, तिथेच तीन वर्षे गेली होती. मी आमदार असतानाही त्यावेळी तो प्रश्न सोडवता आला नाही. अशी कारणे होती. त्यावेळी स्टोरेज आधी करणे महत्त्वाचे होते. त्यात झालं असं की, निरा-देवघरची १९८५ ची प्रशासकीय मान्यता ८.५ टीएमसीची होती. हे तांत्रिक काम आहे. त्याच्यावरही खासदार आणि त्यांचे केंद्राचे मंत्री बोलतात. लवादाने या धरणाची ७५ टक्के विश्वासार्हता मान्य केली होती. मी काय केले की, ७५ टक्के विश्वासार्हता मी ५० टक्क्यांवर नेऊन धरणाची ११.५ टीएमसी पाणी क्षमता केली. हे खासदार आम्ही हे केलं म्हणतात. ते चुकीचे असून एका एक्झिक्युटीव्ह इंजिनिअरने या धरणाची सिरीजच बदलली. नवीन सिरीज, नवीन पाणी, नवीन पाऊस, त्यामुळे त्यांनी ७५ टक्के विश्वासार्हतेचं ११.५ टीएमसी पाणी झाले. ते म्हणतात की, हायड्रोलॉजी बदलली. हायड्रोलॉजी पडणार्‍या पावसावर होती. हा विश्वासार्हतेचा विषय आहे. विश्वासार्हता म्हणजे १० वर्षात पाच वेळा हे धरण भरेल, ७५ टक्केची विश्वासार्हता म्हणजे १० वर्षात साडेसात वेळा हे धरण भरेल, एवढाच विषय हा येतो. याचंही ते श्रेय घेतात. ते सुदैवी माणूस आहेत आणि मी दुर्दैवी. त्यांना सगळं शिजवून आणलेलं आहे, ते आता घडतंय. या धरणाची सीरिजचं ५० टक्क्यांची होती. ५० टक्क्यांनी हे धरण झालं म्हणजे त्याचे स्टोरेज वाढले. त्याचा फायदा झाला नाही का? अनुशेषामुळे निरा-देवघरला वरून निधी मिळत नव्हता, कारण त्यांना ५० टक्क्यांत असल्याने ते पटत नव्हते. त्यांना ७५ टक्के विश्वासार्हता पाहिजे होती, इकडे अनुशेषाने अडले होते. त्याच्यावर ते बोलत नाहीत, हेच माझे म्हणणे आहे. ते या एकाच मुद्दयावर बोलतात. त्यांना बाकीचे मुद्दे नाहीत. कारण त्यांना त्यासाठी वेळ नाही. मी पहिल्यांदा फलटणचे सुपरिटेंडेंट इंजिनिअर कुलकर्णी यांच्याकडे घरी बसून ‘लवाद’ समजून घेतला. पाण्याची फेररचना केली. प्रशासनावर अवलंबून न राहता कृष्णा खोरेच्या पाच खोर्‍यातील ८१ टीएमसी पाणी मी वाढवून घेतले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘बोल भिडू’ या ‘यू ट्युब’ चॅनलला नुकतीच आपली मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्या ३० वर्षांच्या राजकारणाचा लेखा-जोखा मांडला. या मुलाखतीत त्यांनी आपण फक्त आजवर पाण्यासाठीच राजकारण केल्याचे सांगितले. आपले विरोधक आपल्यावर आज जे आरोप करीत आहेत, ते फक्त स्वार्थासाठीच करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यात आज जे बागायत क्षेत्र म्हणजे उसाचे मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे पीक व या पट्ट्यात चालणारे चार साखर कारखाने हे मी आणलेल्या पाण्यामुळेच उभे राहिले आहेत, असे ठासून सांगितले. त्यांच्या मुलाखतीचा घेतलेला आढावा…


Back to top button
Don`t copy text!