दुधेबावी फेस्टिव्हलमध्ये प्रा. वसंतराव हंकारे यांचे व्याख्यान

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दुधेबावी फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते प्रा. वसंतराव हंकारे यांचे आज व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्थैर्य, दुधेबावी, दि. ९ ऑक्टोबर : फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे ग्राम विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुधेबावी फेस्टिव्हल अंतर्गत संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक वसंतराव हंकारे यांचे आज (दिनांक ९) सायंकाळी ७:३० वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी दिली.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या व्याख्यानमालेत प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री कार्यालय मंत्रालयातील अवर सचिव धीरज अभंग आणि सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील प्रभावशाली वक्ते आणि विनोदी प्रबोधनकार प्राध्यापक वसंतराव हंकारे यांचे विचार ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

आयोजकांचे आवाहन

या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे, सचिव विठ्ठल सोनवलकर, खजिनदार युवराज एकळ, कार्याध्यक्ष संतोष भांड, व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष सागर कराडे आणि सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!