
थेट WhatsApp वर मिळवा
दुधेबावी फेस्टिव्हलअंतर्गत आयोजित ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या रंगतदार स्पर्धेत माधुरी ठोंबरे यांनी पैठणी पटकावली असून, सोन्याची नथ आणि चांदीच्या छल्ल्यासह आकर्षक बक्षिसांची लयलूट करण्यात आली.
स्थैर्य, दुधेबावी, दि. १३ नोव्हेंबर : दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुधेबावी फेस्टिव्हलअंतर्गत महिलांसाठीचा ‘खेळ पैठणीचा’ मनोरंजक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. राजेंद्र खरात प्रस्तुत आणि वाघमोडे ज्वेलर्स फलटण प्रायोजित या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत खेळाचा आनंद घेतला.
स्पर्धेतील विजेत्या आणि बक्षिसे
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत पैठणीचा मानकरी होण्याचा बहुमान सौ. माधुरी ठोंबरे यांनी मिळवला. द्वितीय क्रमांक सौ. अक्षदा झारगड यांनी मिळवून चांदीचा छल्ला पटकावला. तृतीय क्रमांक मिळवत सोन्याच्या स्पेशल नथीच्या मानकरी सौ. जयश्री सोनवलकर ठरल्या. चतुर्थ क्रमांक सौ. छाया सोनवलकर यांनी मिळवून सोन्याची नथ जिंकली, तर पाचवा क्रमांक सौ. मयुरी सोनवलकर यांनी मिळवून भांड्यांचा सेट पटकावला.
मान्यवरांची उपस्थिती व आयोजन
यावेळी पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, पंचायत समिती सदस्या सौ. विजयाताई सोनवलकर आणि सरपंच सौ. भावनाताई सोनवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी स्वागत केले, तर व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष विजयकुमार नाळे व खजिनदार डॉ. युवराज एकळ यांनी केले. सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर यांनी आभार मानले.





