मुद्रांक विक्रेत्यांच्या शेडमध्ये शुकशुकाट,आठ दिवस कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय


 

स्थैर्य, सातारा, दि. ११ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून गुरुवार, दि. 10 ते  18 सप्टेंबरपर्यंत आठ दिवस कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांनी घेतल्याने गुरुवारी सातारा तहसीलदार कार्यालयाच्या परिसरातील मुद्रांक विक्रेत्यांच्या शेडमध्ये शुकशुकाट होता.  ज्या नागरिकांना या बंदबाबत काहीही कल्पना नव्हती त्यांची मोठी गैरसोय झाली.

मुद्रांक विके्रते व दस्त लेखनिक यांचा थेट जनतेशी संपर्क येत असल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका ओळखून तसेच या ठिकाणी सतत गर्दी होत असल्याने त्या अनुषंगाने जनतेमध्ये कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पाटण येथील  देवकांत यादव व कराड येथील  प्रकाश देशमुख यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे धास्तावलेले मुद्रांक विक्रेता व लेखनिक यांनी आम्हाला कोविड सुरक्षा विमा कवच व अन्य सुविधा शासनाकडून मिळाव्यात अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना बुधवारी दिले आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!