
दैनिक स्थैर्य । 19 मे 2025। सातारा । सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भाग असलेल्या दुष्काळी माण-खटाव मध्ये 39 गावे 357 वाड्यांना 49 खाजगी पिण्याच्या पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 14 खाजगी विहिरी व सहा हातपंप शासनाने आदी ग्रहण केले आहेत. पिण्यासाठी टँकरद्वारे आलेले पाणी भरताना दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यातील पाणी पाहून अनेकांचे हृदय गहिवरले आहे. समाज माध्यमावर त्याचे विदारक चित्र दुष्काळग्रस्तांच्या व्यथा बोलक्या करत आहेत. शासकीय माहितीनुसार सातारा जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकार्यांच्या अथक प्रयत्नाने पाणीटंचाई कक्षाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना तातडीने पाणीपुरवठा केला जात आहे. भविष्यात टैंकर फेर्या वाढण्याची शक्यता आहे.
सध्या दहिवडी व शिंगणापूर भागातील बिजवडी, पांगरी, येळेवाडी, पाचवड, राजवडी जाधववाडी, वडगाव, मोगराळे, तोंडले आणि मोही डंगिरेवाडी, थदाळे, वावरहिरे, अनभुलेवाडी, दानवलेवाडी सोकासन, शेवरी, धुळदेव, वरकुटे, म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, भाटकी, संभुखेड, खडकी, रांजणी, जाशी, पळशी, पिंगळी बु, मार्डी, खुटबाव पर्यंती, इंजबाव भालवडी, पानवण, विरळी, वारुगड, कुळकजाई, शिरवली, सत्रेवाडी, टाकेवाडी, उकिर्डे, कोळेवाडी, परकंदी, शिंदी बु, महिमानगड, सुरुपखानवाडी,पांढरवाडी, कुकुडवाड, दोरगेवाडी, बुध, औंध, का. खटाव, मायणी, निमसोड मांजरवाडी, नवलेवाडी, मोळ, जायगाव करांडेवाडी, एनकुळ, डांभेवाडी, तडवळे दातेवाडी, अनफळे, खातवळ, धौडेवाडी कामथी पुसेगाव, कटगुण, उंबरमळे, कातळगेवाडी, कलेढोण, कान्हरवाडी खटाव, जाखणगाव या ठिकाणी व परिसरात शासनाने टँकरने पाणीपुरवठा केल्यामुळे अनेकांची तहान भागत आहे. दुष्काळ नाहीसा व्हावा. अशी सर्वांचे प्रामाणिकपणे इच्छा आहे.
त्या दृष्टीने मार्गक्रमण होत असताना काही जण इव्हेंट म्हणून त्याच्याकडे पाहत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याचे चित्रीकरण ही स्थानिकांच्या बाबत दिशाभूल केली जात आहे की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.
सत्ताधार्यांवर अंकुश ठेवणारे विरोधक संपले असल्याने विरोधकांचाही दुष्काळ दिसून येत आहे.