
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ९ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण शहरातील बारामती चौकामध्ये असलेल्या पंचशील रिक्षा स्टॉप संघटनेकडून सालाबादप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर व अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंचशील रिक्षा स्टॉप संघटना गेली १० वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हा रक्तदान व अन्नदानाचा उपक्रम राबवित आहे. यावर्षीही भव्य स्वरूपात या उपक्रमाचे आयोजन संघटनेकडून करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पंचशील रिक्षा स्टॉप संघटना, बारामती चौक, फलटण येथे होणार आहे. या कार्यक्रमाची वेळ शुक्रवार, दि. १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० अशी राहील.
या रक्तदान शिबिरात व अन्नदान कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.
