डॉ. तात्याराव लहाने यांना ‘श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार’ प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १५ मे २०२४ | फलटण |
श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर-राजेसाहेब, फलटण यांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त व श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि., फलटणचे संस्थापक चेअरमन श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रेरणेने देण्यात येणारा ‘श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार २०२३-२०२४’ प्रसिध्द नेत्रतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार प्रदान सोहळा श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवात मंगळवार, दि. १४ मे २०२४ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड सहकारी बँक लि. पिंपरीचे अध्यक्ष श्री. शिरीष देशपांडे होते.

यावेळी शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, व्हा. चेअरमन सौ. योगिनी पोकळे व बँकेचे संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!