दैनिक स्थैर्य | दि. १५ मे २०२४ | फलटण |
‘मॅग आणि माऊली फाउंडेशन’ संचलित जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर, फलटण यांच्यामार्फत येणार्या पावसाळ्यादरम्यान प्रथम नोंदणी करणार्या ५०० “पर्यावरण प्रेमी शेतकर्यांना” खालील अटींवर पाच रोपांचे मोफत वाटप दि. २० जून २०२४ ते १५ जुलै २०२४ पर्यंत करण्यात येणार आहे.
मोफत रोपे नेणार्या शेतकर्यांनी खालील अटींचे पालन करावे.
१. दिलेल्या रोपांचे संगोपन व जतन करावे
२. दिनांक १५ जून २०२४ पर्यंत नोंदणी अत्यावश्यक
३. रोपे दिलेल्या तारखेस आणि वेळेत जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरमधून स्वतः घेऊन जावीत.
लागवडीसाठी मोफत उपलब्ध केली जाणारी रोपे –
१. वड किंवा पिंपळ
२. केसर आंबा
३. जांभूळ
४. पेरू किंवा चिक्कू
५. शेवगा
नोंदणी आणि रोपे घेवून जाण्याचा पत्ता –
जनसेवा डायग्नोस्टीक सेंटर, दुसरा मजला, स्वरा हाईटस्, आर्यमन हॉटेलसमोर, डी.
एड्. चौक, रिंगरोड, फलटण.
नाव नोंदणीसाठी संपर्क :
जनसेवा लॅब – ९५२९२३३०६७
डॉ. अतुल दोशी – ९७६७४६९९९८
श्री. तात्या गायकवाड – ८६००३९२४४४
श्री. गणेश बोराटे – ९९२२५ ७५७८६
श्री. प्रशांत धनावडे – ९८९००४३६००
श्री. राहुल कर्णे – ९८८१८१२५२०