ना.श्रीमंत रामराजेंच्या हस्ते पालिका कर्मचार्‍यांना रु.15 हजार सानुग्रह अनुदानाचे वितरण


स्थैर्य, फलटण दि.31 : महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते फलटण नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदानाचे वितरण नुकतेच करण्यात आले.

पालिकेचे 220 अधिकारी/कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान प्रत्येकी 15000 रुपये प्रमाणे 33 लाख रुपयांचा धनादेश ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या ‘लक्ष्मी विलास’ या निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रमात म्युनिसिपल कर्मचारी संघटना पदाधिकार्‍यांकडे सुपूर्द केला. यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा नगरसेवक श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, राहुल निंबाळकर, भाऊ कापसे, दादा चोरमले, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, कामगार संघटना उपाध्यक्ष सुरेश अहिवळे, खजिनदार सुनिल काकडे, सेक्रेटरी बांद्राबळ गायकवाड, शिव भोला काकडे, सुनिल अहिवळे, दिलीप अहिवळे, मनोज मारुडा, सौ. लक्ष्मी नामदेव काकडे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

पालिकेच्या कर्मचार्‍यांना प्रत्येक वर्षी दिवाळी सणापूर्वी सानुग्रह अनुदान दिले जाते, यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व वातावरण अस्थिर असल्याने विलंब होताच कामगार संघटनेने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे धाव घेऊन नगर परिषद प्रशासनाला सानुग्रह अनुदान देण्याची सूचना करण्याबाबत विनंती केली होती, त्यावेळी श्रीमंत रामराजे यांनी पूर्तता करण्याचे आश्‍वासन कामगारांना दिले होते, त्याची पूर्तता झाल्याबद्दल संघटनेच्यावतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना सुनिल काकडे व बांद्राबळ गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!