
दैनिक स्थैर्य । 18 जून 2025 । फलटण । येथील क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्यावतीने संस्थापक मिलिंद नेवसे यांच्या हस्ते सद्गुरू सेवा मंडळाच्या दिंडीस औषधांचे वाटप करण्यात आले.
सद्गुरु सेवा मंडळाची दिंडी वडले, तिरकवाडी, दुधेबावी, कोळकी या परिसरातून निघते. या दिंडीत शंभर नागरिक सहभागी होतात. या दिंडीला गेली दहा वर्षे मिलिंद नेवसे औषधांचे वाटप करत असतात. यंदाच्या वर्षी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून औषधांचे वाटप केले आहे.
यावेळी सद्गुरु सेवा मंडळ दिंडीतील हणमंतराव शिंदे, रामचंद्र ठोंबरे, यशवंत सोनवलकर, ईश्वरा ठोंबरे, बाळू सोनवलकर, भीमराव सोनवलकर उपस्थित होते.