
दैनिक स्थैर्य । दि. १८ जुन २०२५ । फलटण । धोम – बलकवडी, नीरा – देवघर, वीर व गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला समाधानकारक नसली. पुन्हा पावसाने सुरुवात केल्याने सर्व धरणे भरतील अशी अपेक्षा आहे
23 टीएमसी क्षमतेच्या भाटघर धरण परिसरात आज सकाळी संपलेल्या 24 तासात 11 मि. मी. पाऊस झाला, आजपर्यंत 145 मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात 8.39 टीएमसी म्हणजे 6.09 टक्के पाणीसाठा आहे.
10 टीएमसी क्षमतेच्या वीर धरण परिसरात आज सकाळी संपलेल्या 24 तासात 1 मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत 102 मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात 1.88 टीएमसी म्हणजे 19.96 टक्के पाणीसाठा आहे.
12 टीएमसी क्षमतेच्या नीरा – देवघर धरण परिसरात आज 44 मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत 222 मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात 1.50 टीएमसी म्हणजे 12.83 टक्के पाणी साठा आहे.
4 टीएमसी क्षमतेच्या गुंजवणी धरण परिसरात काल 43 मि. मी. पाऊस झाला असून आजपर्यंत 300 मि. मी. पाऊस झाला आहे. धरणात 1.02 टीएमसी म्हणजे 27.64 टक्के पाणी साठा आहे.