
दैनिक स्थैर्य । 18 जून 2025 । फलटण । भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यावतीने बांधकाम कामगार, लाडकी बहीण, वयोश्री, संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजनांच्या लाभार्थी कुटूंबांचा स्नेह मेळावा व स्नेह भोजन गुरुवार दि. 19 जून रोजी सायंकाळी 6.00 वाजता मंगल कार्यालय (मारवाड पेठ) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आमदार सचिन पाटील असून स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अॅड. सौ.जिजामाला नाईक निंबाळकर, सौ. मनिषाताई नाईक निंबाळकर आहेत.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, शिवसेनेचे फलटण तालुकाध्यक्ष नानासो (पिंटूशेठ) इवरे, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, युवानेते अभिजितभैय्या नाईक निंबाळकर यांची उपस्थिती लाभणार आहे.
या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक माजी नगरसेवक सुदामराव मांढरे, अनुप शहा, फिरोज आतार, अजय माळवे यांनी केले आहे.