श्रीमंत संजीवराजेंच्या वाढदिवसानिमित्त ठाकुरकीच्या मूकबधीर विद्यालयात रंगीत कपडे वाटप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तरडगाव येथील श्रीमंत संजीवराजे मित्र मंडळाच्या वतीने ठाकुरकी (ता. फलटण) येथील महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना रंगीत कपड्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरवर्षी श्रीमंत संजीवराजे मित्र मंडळ तरडगाव यांच्या वतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. यापूर्वी मंडळाच्या वतीने वाढदिवसानिमित्त भैरवनाथ मंदिर कलशारोहनास रोख २५ हजार रुपये, साखरवाडी अनाथ आश्रमातील मुलींना कपडे वाटप, निवृत्त सैनिकांचा सपत्नीक सत्कार, कोरोना काळात रुग्णांना मदत हे सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!