फलटणची दिशा झेंडे ठरली ‘चंदूकाका सराफ स्टाईल आयकॉन क्वीन २०२६’ ची विजेती


स्थैर्य, फलटण, दि. २ जून : फलटण येथील दिशा संतोष झेंडे हिने ‘चंदूकाका सराफ अँड सन्स’तर्फे आयोजित ‘फलटणची स्टाईल आयकॉन क्वीन २०२६’ या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. ३० मे रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत तिने आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर हा बहुमान मिळवला.

दिशा झेंडे ही सध्या विद्यार्थिनी असून, तिने कमी वयात विविध क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती एक उत्तम नृत्यांगना आणि मॉडेल म्हणूनही ओळखली जाते.

सौंदर्य आणि फॅशन क्षेत्रासोबतच दिशाने क्रीडा क्षेत्रातही मोठी कामगिरी केली आहे. तिने मार्शल आर्ट्स या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील तिच्या या उल्लेखनीय कामगिरीनंतर आता मॉडेलिंग क्षेत्रात मिळवलेल्या या यशाने फलटणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल फलटण शहर आणि परिसरातून दिशा झेंडे हिचे कौतुक केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!