फलटणला लाल दिवा येणार?; तालुक्यात चर्चा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 14 ऑगस्ट 2024 | फलटण | सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी नुकताच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथे पक्ष प्रवेश केला आहे. त्यांनाच कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे फलटण तालुक्यात लाल दिवा येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

फलटण तालुक्यामध्ये धनगर समाजाचे नेते म्हणून माणिकराव सोनवलकर यांची ओळख आहे. त्यांना पद दिल्यानंतर आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो; असेही बोलले जात आहे.

यानुसार लवकरच फलटण मध्ये एक लाल दिवा येणार असल्याच्या चर्चा फलटण शहर असं हे तालुक्यामध्ये ठीक ठिकाणी रंगू लागल्या आहेत.

Back to top button
Don`t copy text!