वीर धरणातून नीरा नदीत ३३,५५२ क्युसेक्स विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने प्रशासनाचा निर्णय, विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. १८ ऑगस्ट : वीर धरण पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज, दि. १८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता नीरा नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, सध्या ३३,५५२ क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

निरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी ही माहिती दिली आहे. या वाढीव विसर्गामुळे नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीच्या दोन्ही बाजूंच्या गावांतील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण आणि पाण्याची आवक लक्षात घेता, नदीपात्रातील विसर्गात भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये तसेच आपली जनावरे व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!