
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, कातरखटाव, दि. ०३ : बोंबाळे (भाग्यनगर ता.खटाव ) येथील ज्येष्ठ नेते माजी सरपंच दिनकर नामदेव निंबाळकर (वय ८५ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.परिसरात ते आप्पा नावाने परिचित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, पाच मुली ,सून,जावई, नातवंडे असा परिवार असून विकास सोसायटीचे संचालक तथा स्वस्त धान्य दुकानदार धनंजय निंबाळकर यांचे ते वडील होत.
पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिह देशमुख, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, राजुभाई मुलाणी, विकास साबळे,श्रीकांत शेंडे, श्रीनिवास कदम आदींसह मान्यवरांनी कुटुंबियांचे सांत्वन केले.
