
दैनिक स्थैर्य । 15 मे 2025। फलटण । गुणवरे येथील ईश्वर कृपा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजेचा इयत्ता दहावीचा इंग्रजी माध्यमाचा निकाल 100 % टक्के लागला. ग्रामीण भागामध्ये इंग्रजी माध्यमातून दरवर्षी 100 % टक्के निकाल लावणारी आदर्श शाळा म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
सिद्धी अबदागिरे हिने 95 % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. वैष्णवी त्रिपुटे हिने 88 %गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. सिद्धी राठोड, सिद्धी मुळीक या दोघींनी 87.20 % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. तसेच प्रणव माळशिकारे याने 86 टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक मिळवला. तेजस्विनी ठणके हिने 85.40 % गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला. प्रवीण हरिहर याने 84.60 % गुण मिळवून सहावा क्रमांक मिळवला.
या परीक्षेस 25 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 18 विद्यार्थी डिश्टिंगशन 5 विद्यार्थी, फर्स्ट क्लास व सेकंड क्लासने 2 उत्तीर्ण झाले.
विद्यार्थ्यांना प्राचार्य गिरिधर गावडे ,उपशिक्षिका पूनम जाधव, सोनाली मोरे, सुकन्या पवार, तेजस्विनी ठणके, आशा धापटे, माधुरी बनकर व शीतल कापसे यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर तात्या गावडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्ग संभाजी गावडे, सचिव सौ. साधनाताई गावडे यांनी अभिनंदन केले.