भारतीय जनता पार्टीच्या खटाव तालुका अध्यक्षपदी धनंजय चव्हाण तर माण तालुका अध्यक्षपदी म्हसवड येथील शिवाजीराव शिंदे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, खटाव, दि. ३१ (विनोद खाडे) : सद्य स्थितीत सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार व दोन खासदार असून पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्षाच्या वतीने सर्वत्र नूतन पदाधिकारी नियुक्ती सुरू आहे. भारतीय जनता पार्टीच्या खटाव तालुका अध्यक्ष पदी खटाव तालुक्यातील येरळवाडी गावचे सुपुत्र व कातर खटाव पंचायत समितीचे विद्यमान सदस्य धनंजय चव्हाण तर माण तालुका अध्यक्ष पदी माण तालुक्यातील म्हसवड येथील शिवाजीराव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

 

गेल्या डिसेंबर महिन्यात १६ मंडलांपैकी १० मंडल अध्यक्ष निवडी झाल्या. कोरोना संकटाने राहिलेल्या ६ पैकी ४ मंडल अध्यक्ष यांची निवड जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दि १० ऑगस्ट रोजी जाहीर केली होती. उर्वरित २ मंडल अध्यक्षपदी माण तालुक्यातील म्हसवड येथील शिवाजीराव शिंदे यांची माण तालुकाध्यक्षपदी तर येरळवाडी येथील धनंजय चव्हाण यांची खटावतालुकाध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यातआली.जुन्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपली आहे. परंतु, जुन्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यात कार्यरत राहून आपल्या अनुभवाचा फायदा नवीन पदाधिकाऱ्यांना करून द्यावा आणि पक्ष संघटन वाढवण्यास मदत करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केले आहे.

भाजप पक्ष वाढीसाठी अनुभवी दोन नेत्यांची निवड झाल्याने माण खटाव तालुक्यात भाजपामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. सर्वांना सोबत घेऊन अध्यक्ष पदाची धुरा समर्थ पणे पार पाडण्यात येईल असा विश्वास नूतन पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी बद्दल त्यांचे प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंह भोसले जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी अभिनंदन केले.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!