धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम होणार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, नागपूर, दि.१३: धम्मचक्र प्रवर्तन
दिनी लाखोंच्या संख्येने भाविक दीक्षाभूमीचे दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र
कोरोना महामारीचे थैमान लक्षात घेता राज्य शासनाने दिलेल्या निर्बंधांचे
पालन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम
आयोजित करणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी डॉ.
बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे झालेल्या बैठकीत दिली.

कोविड-19 पार्श्वभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित न
करण्याच्या स्मारक समितीने 25 सप्टेंबर रोजी घेतलेल्या निर्णयाला
पालकमंत्र्यांनी दुजोरा दिला. राज्य शासनाने कोणताही यात्रा महोत्सव व
धार्मिक स्थळ न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्मारक समितीने
घेतलेल्या निर्णयासोबत प्रशासन आहे. तथापी उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी
प्रशासन बांधील राहील. डॉ. तोपर्यंत अनुषंगिक पूर्वतयारी ठेवावी, असेही
त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!