
अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजवाडा परिसरात देवगड हापूस आंब्याची आवक झाली आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्याने हापूस १००० ते १५०० रुपये प्रति डझन दराने विकला जात आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १६ एप्रिल : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला घरोघरी आमरसाच्या जेवणाचा बेत आवर्जून केला जातो. या सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात फळांचा राजा असलेल्या ‘देवगड हापूस’ आंब्याची आवक सुरू झाली आहे. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका आंबा उत्पादनाला बसल्याने हापूसचे दर कडाडले आहेत.
अवकाळीमुळे उत्पादन घटले, दरांमध्ये वाढ
यंदा आंब्याचा मोहोर गळल्याने आणि अवकाळी पावसामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. बाजारात आंब्याची आवक तुलनेने कमी असल्यामुळे सध्या हा अस्सल देवगड हापूस आंबा तब्बल १००० ते १५०० रुपये प्रति डझन या चड्या दराने विक्री होत आहे. वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांना आंबा खरेदी करताना आखडता हात घ्यावा लागत असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे.
राजवाडा परिसरात देवगड हापूस उपलब्ध
अक्षय तृतीयेच्या सणासाठी सातारकरांची मागणी लक्षात घेता, शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या राजवाडा परिसरातील ‘हे देवगड हापूस आंबे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत,
(छायाचित्र : अतुल देशपांडे, सातारा)

