दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण शहरामध्ये असणाऱ्या दलित वस्तीमध्ये विकास कामे कोणतीही कमी होणार नाही व विकास कामांची प्रलंबित कामे आहेत, ती सुद्धा तातडीने मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन संजय गायकवाड यांनी दिले.
फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दलित वस्ती येथील कामांची पाहणी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२२ चे अध्यक्ष ॲड. अनिकेत अहिवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दलित वस्तीतील मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले होते. त्यानंतरच्या पाहणी दरम्यान मुख्याधिकारी संजय गायकवाड बोलत होते. यावेळी अॅड. अनिकेत अहिवळे, विक्रांत काकडे, कुणाल काकडे, रणजित माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी मंगळवार पेठ येथील रखडलेल्या विकासकामांची माहिती घेतल्यानंतर सदरील विकास कामे ही तातडीने मार्गी लावण्यात आली.