
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ३१ मार्च २०२३ | फलटण |
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या ना. डॉ. नीलमताई गोर्हे यांनी गुरुवार, दि.३० मार्च रोजी फलटणच्या ऐतिहासिक श्रीराम मंदिर व मुधोजी मनमोहन राजवाड्यास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले.
याप्रसंगी ना. नीलमताई गोर्हे यांचे स्वागत महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती, विद्यमान आमदार तथा फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दीपकराव चव्हाण व इतर मान्यवरांनी केले.
