भुयारी मार्गासाठी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ जून २०२२ । लोणंद । पुणे-मिरज दरम्यान असणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावर वाढलेल्या वाहतूकीमुळे लोणंद येथील रेल्वेमार्गाच्या पुर्वेस असणाऱ्या शाळा – काॅलेजच्या विद्यार्थ्यांसह पुर्वेस असणाऱ्या नवीन वसाहतीतील नागरिकांना येण्याजाण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात यावा. यासाठी लोणंद नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील व सहकाऱ्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळेस लोणंद रेल्वे प्रवासी संघटनेकडून जास्तीत जास्त एक्सप्रेस लोणंद रेल्वे स्टेशनला थांबवणे, जुना फलटण रोड स्काय वॉक, जुन्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे, प्लॅटफॉर्म वरील प्रसाधनगृह स्वच्छ व वापरण्यायोग्य स्थितीत ठेवणे, दिव्यांगासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच तिकीट खिडकी व चौकशी यासाठी वेगवेगळ्या खिडक्या करणे, प्लॅटफॉर्मवरील शेडची लांबी वाढवणे, वाय-फाय, सीसीटीव्ही, हायमास्ट लाईटची सोय करणे आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन रेल्वेच्या पॅसेंजर कमिटीचे चेअरमन यांना देण्यासाठी लोणंद येथील रेल्वे अधिकाऱ्यांकडे देण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील यांच्यासह नगरसेवक गणीभाई कच्छी, प्रदीप क्षीरसागर, गिरीश रावळ व्यंकटेश हेब्बार, प्रसन्न शहा, सुनील शहा, राजेश भाटिया, रोहित अग्रवाल, मनोज बारटक्के , गोविंद धामणकर , म्हस्कूआण्णा शेळके, सुनील यादव, निखिल काळे सुनील रासकर ,जमीर शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!