
दैनिक स्थैर्य । दि. १८ जून २०२२ । सातारा । जिल्ह्यातील एका तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनंतर अक्षय प्रकाश साठे रा. विलासपूर, सातारा याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. मागील काही महिन्यांपासून तरुण त्या तरुणीचा पाठलाग करत असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे, असेही पोलिसांनी सांगितले. याबाबतचा अधिक तपास हवालदार मोहिते हे करीत आहेत.