उपसंचालक किरण मोघे यांचा महाराष्ट्र संपादक परिषदेतर्फे सत्कार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 16 जून 2025 । कराड । मनमिळाऊ, नम्र, सहकार्यवृत्ती व तळमळीच्या स्वभावामुळे पुणे विभागीय माहिती उपसंचालक किरण मोघे यांनी अनेकांच्या ह्रदयात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शासन व पत्रकार तसेच शासन व सर्वसामान्य जनतेमधील दुवा म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत उल्लेखनीय ठरली आहे. अशा आशयाचे गौरवपत्र पुणे येथील विभागीय माहिती कार्यालयात देऊन महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने उपसंचालक किरण मोघे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य गोरख तावरे, साताराचे जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, पुणेचे जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, सोलापूरचे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उपस्थित होते.

किरण मोघे यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यरत असताना पत्रकारांसोबत सुसंवाद ठेवत शासनाच्या योजनांची पारदर्शक माहिती देण्याचे काम केले. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा व पारदर्शक कार्यपद्धतीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांची पुणे विभागीय माहिती उपसंचालक पदावर नियुक्ती केली आहे. ही निवड राज्यातील संपादक व पत्रकारांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. असे गौरवपत्रात म्हटले आहे.

किरण मोघे यांची उपसंचालक म्हणून पदोन्नतीबद्दल महाराष्ट्र संपादक परिषद, मुंबई तर्फे मा. किरण मोघे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

गौरवपत्रावर महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे, कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, सचिव अनंत पाध्ये, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य गोरख तावरे यांच्या स्वाक्षरी आहेत.

पत्रकार बांधवांतर्फे किरण मोघे यांची उपसंचालक म्हणून पदोन्नतीबद्दल शुभेच्छा. उपसंचालक पदाची नवीन जबाबदारी यशस्वी ठरून अधिक व्यापक कार्य करतील.

गोरख तावरे

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!