उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इब्राहिम अल्काझी यांना श्रद्धांजली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई दि. ४ : ख्यातनाम नाट्यकर्मी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक, पद्मविभूषण इब्राहिम अल्काझी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले  असून भारतीय नाट्य, कलासृष्टीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात  उपमुख्यमंत्र्यांनी इब्राहिम अल्काझी यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, पुणे येथे जन्मलेल्या इब्राहिम अल्काझी यांचं पुण्याशी, महाराष्ट्राशी आणि मराठी भाषेशी  विशेष नातं होतं. देश पातळीवर काम करताना त्यांनी अनेक प्रतिभासंपन्न कलाकार घडवले. भारतीय नाट्य आणि कलासृष्टी  समृद्ध करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. भारतीय कलाक्षेत्राला त्यांनी दिलेला  जागतिक दृष्टिकोन, त्यांनी घडविलेल्या कलाकारांच्या पिढ्या त्यांची स्मृती चिरंतन ठेवतील. इब्राहिम अल्काझी  या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!