
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, मुंबई, दि. २३: प्रसिद्ध संस्कृत विद्वान पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे.
ते आपल्या शोक संदेशात म्हणाले, पंडीत गुलाम दस्तगीर बिराजदार हे देशाच्या सांस्कृतिक समृद्धतेचे प्रतिक होते. संस्कृतचे गाढे अभ्यासक, आदर्श शिक्षक, सिद्धहस्त साहित्यिक, शिक्षण चळवळीतील य कार्यकर्ते अशा अनेक भूमिकांतून त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनाने संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसारासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. ज्ञानतपस्वी पंडित दस्तगीर बिराजदार साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.



