उमेदवार असूनही मतदानापासून वंचित; बिग बाॅस फेम अभिजीत बिचुकले संतापले


 

स्थैर्य, सातारा, दि.१: मराठी बिग बाॅसफेम अभिजीत बिचुकले हे पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. आज (मंगळवार) साता-यात ते पत्नी अलंकृता यांच्या समवेत मतदानासाठी आले. परंतु त्यांचे नावच मतदार यादीत नसल्याचे त्यांना केंद्रावर समजले. 

या प्रकारामुळे बिचुकलेंनी प्रशासनासह राजकीय पक्षांवर षडयंत्राचा आराेप केला. माझी पत्नी अलंकृता यांनी मतदान केले. त्यानंतर मी माझे नाव यादीत शाेधले परंतु ते नसल्याचे समजले. पून्हा मी तेथील शासनाच्या हेल्प डेस्कवर गेलाे. तेथेही माझे नाव यादीत नसल्याचे मला सांगण्यात आले.

हा प्रकार निंदनीय आहे. मी स्वतः उमेदवार आहे. पदवीधर आणि शिक्षक या दाेन्हीत मी निवडणूक लढवित आहे. तरी माझे नाव यादीत नसणे म्हणजे षडयंत्रच म्हणावे लागेल. मतदारांनी जागरुकपणे मतदान करावे एवढंच मी आत्ता तरी आवाहन करताे असे बिचुकलेंनी नमूद केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!