दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण बसस्थानकातील आगार व्यवस्थापक निवासस्थान व पाण्याची मोठी टाकी जुनी, जीर्ण झाल्याने आता जमीनदोस्त करून दत्त मंदिर ते सध्याचे आऊट गेटपर्यंत छोटे १० बाय ५ आकाराचे गाळे उभारून त्यामध्ये मिठाई, फळे, ज्यूस बार, झेरॉक्स सेंटर व अन्य प्रकारच्या दुकानांसाठी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
दुकान गाळ्यांच्या वरच्या बाजूला पाण्याच्या टाक्या ठेवाव्यात आणि वॉचमन गेट ते दत्त मंदिर या भागात खालच्या बाजूला आगार व्यवस्थापक कार्यालय आणि वरच्या मजल्यावर आगार व्यास्थपक यांची केबिन, छोटा मिटिंग हॉल उभारावा. सध्या एस. टी. कर्मचारी सोसायटी, दवाखाना असलेल्या जागेत आगार व्यवस्थापक निवासस्थान, दवाखाना, सोसायटी ऑफिस इमारत उभारावी, अशी मागणी होत आहे.