
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
भारतातील सर्वात खडतर असा अमरनाथ यात्रा मार्ग फलटण ट्रेकर्स क्लबचे सदस्य श्री. जावेदभाई तांबोळी, श्री. सुरेशराव काकडे, श्री. चंद्रकांत पखाले, श्री. आत्माराम बोराटे सर, श्री. रामचंद्र कर्णे, श्री. राजेंद्र निंबाळकर, श्री. श्रीरंग खाडे यांनी यशस्वीरित्या वेळेत पूर्ण केला. त्याबद्दल त्यांचा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आज सत्कार केला.
अमरनाथ यात्रा करणार्या यात्रेकरूंना यात्रेपूर्वी आपल्या ‘फिजिकल फिटनेस’चे सर्टिफिकेट मिळवावे लागते. कारण पूर्ण चढाईची ही यात्रा देशातील अत्यंत कठीण यात्रा समजली जाते. फलटण ट्रेकर्स क्लब अशा खडतर यात्रांसाठी प्रशिक्षण आयोजित करते.
