कृषीदूतांकडून विडणीत वृक्षारोपण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण जिल्हा सातारा यांचे संयुक्त मार्गदर्शनाखाली ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत  फलटण तालुक्यातील विडणी येथे वृक्षारोपण करण्यात आले. 

यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लावण्यात आल्याची माहिती प्रशिक्षणार्थी अमिरून युनुस शेख यांनी दिली.सातव्या सत्रातील विध्यार्थ्यांनी शेतकर्‍यांना प्रशिक्षण व शेती संवर्धन याविषयी माहिती दिली.या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कृषिदूत अमिरून युन्नस शेख यांनी उत्तरेश्‍वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विडणी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पूर्ण केला.यावेळी विडणी गावचे सरपंच श्री संजय अभंग, उपसरपंच श्री. अमोल नाळे, तसेच शाळेचे प्राचार्य अभंग सर, शेंडे सर, सोनवलकर सर, बोराटे सर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. डी. निंबाळकर ,प्रा.ए. डी. पाटील व इतर सर्व प्राध्यापकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!