मातंग समाजाचा दिपक चव्हाणांना पाठिंबा : राजन खिलारे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ११ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपकराव चव्हाण यांना सकल मातंग समाजाचा पाठिंबा असून समाजातील कोणत्याही नागरिकांनी भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन स्व. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजन खिलारे यांनी केले.

याबाबत फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिपकराव चव्हाण यांना सकल मातंग समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.

फलटण – कोरेगाव विधानसभा विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने दिपकराव चव्हाण हे निवडणूक लढवत असून फलटण तालुक्यासह कोरेगाव तालुक्यातील सकल मातंग समाजाचा हा दिपकराव चव्हाण यांना पाठिंबा दिला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!