राष्ट्रवादीकडून दीपक चव्हाणच उमेदवार; उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची घोषणा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 29 सप्टेंबर 2024 | फलटण | विधानसभा निवडणूक हि अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून हॅट्रिक आमदार दीपक चव्हाण हेच पुन्हा उमेदवार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे केली असल्याची माहिती समोर येत आहे.

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी दूरध्वनीद्वारे उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आगामी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून हॅट्रिक आमदार दीपक चव्हाण हेच पुन्हा उमेदवार असल्याची घोषणा केली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!