
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २८ डिसेंबर २०२३ | फलटण |
गोखळी (ता. फलटण) येथील रमेश उत्तम उकिरडे (वय ५७) यांनी दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी विषारी द्रवाचे राहत्या घरी प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी पुणे येथे ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी अधिक तपास पो. हवा. अभंग करत आहेत.
