
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २८ डिसेंबर २०२३ | फलटण |
निरगुडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत घराच्या आडोशाला देशी दारूची बेकायदा विक्री करताना एकास ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी पोलिसांनी ७०० रुपये किमतीची देशी दारूच्या १८० मिलीच्या १० सीलबंद काचेच्या बाटल्या असा एकूण ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कोंडीराम बाबासो हुम्बरे (वय ४७, राहणार निरगुडी, तालुका फलटण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास सहा. पोलीस फौजदार एक्के करत आहेत.
