स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालघरच्या पोलीस अधीक्षकपदी दत्तात्रय शिंदे

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
ADVERTISEMENT

स्थैर्य, पालघर, दि. 23 : गडचिंचले साधू हत्याकांडानंतर तात्कालिन पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना शक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर दत्तात्रय शिंदे हे सध्या कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. मुंबई याठिकाणी कार्यरत असून त्यांची पालघरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी शासन आदेशाद्वारे ही माहिती दिली असून कामाच्या ठिकाणावरून त्यांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. अखेर त्यांची बदली करण्यात आली आहे. अद्याप कोणत्या ठिकाणी त्यांची बदली करण्यात आली आहे याबाबत मात्र शासनाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत.तर दत्तात्रेय शिंदे यांनी या पूर्वी सिंधुदुर्ग सांगली आणि जळगाव येथे काम पाहिले आहे.

पालघर प्रकरणात नेमकं काय घडलं?

मुंबईतील कांदिवलीहून आपल्या गुरुचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यविधीसाठी सुशील गिरी महाराज (35), चिकणे महाराज (70) आणि चालक निलेश तेलगडे (30) इको कारने सूरतकडे निघाले होते. त्यांच्याकडे प्रवासाठीचा कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथून पोलिसांनी माघारी पाठवले. परंतु, त्यांना सूरत गाठायचंच होतं. म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पोहचले. मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ जमलेल्या एका जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. जमावानं त्यांची कारही पलटी केली. तेथे असलेल्या गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी या तिघा जखमींना कारमध्ये बसवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने तिथं उपस्थित चार पोलिसांचे काहीच चालले नाही. यावेळी पोलिसांबरोबर असलेल्या जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांनीही जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना कसंबसं आपल्या गाडीत बसवले. मात्र, त्यानंतर जमाव अधिकच आक्रमक झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलिसांनी कशबशी आपली सुटका करून घेतली. मात्र त्या तीन जणांची जमावाने पोलिसांच्या गाडीतच दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृणपणे हत्या केली.


Tags: राज्य
ADVERTISEMENT
Previous Post

‘तो’ कोरोना बाधीत नाही: प्रसाद काटकर

Next Post

आज फलटण येथे करोना उपाय योजना कार्यशाळा

Next Post

आज फलटण येथे करोना उपाय योजना कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

फरांदवाडी कृषिक्रांती कंपनीच्या ग्रेडिंग युनिटचा तालुक्यातील शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा : फिरोज शेख 

March 4, 2021

सातारा पालिकेकडून दोन ठिकाणी कोवीड लसीकरणाची सोय

March 4, 2021

फिटनेस टेस्ट घेताना रिक्षाला अपघात आरटीओ कार्यालयातील घटना : वाहन निरीक्षक जखमी

March 4, 2021

उपसरपंचांचा बंद बंगला फोडला, 2 लाखाचा ऐवज लंपास

March 4, 2021

संपतराव भोसले व पोपटराव भोसले या पिता-पुत्रांचे एकाच दिवशी निधन; राजाळे गावावर शोककळा

March 4, 2021

विक्रम भोसले अजितदादा पवारांच्या भेटीला;विकासकामांसाठी सर्वतोपरी सहकार्याचे दिले आश्‍वासन

March 4, 2021

आता 24 तासात कधीही, तुमच्या सोयीनुसार कोरोना लस घ्या! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

March 3, 2021

चाैथ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा कसून सराव, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलवर नजर

March 3, 2021

‘कनेक्शन तोडून नाही तर हात जोडून महावितरण करणार थकीत वीज बिलाची वसुली

March 3, 2021

सोने स्वस्त : मागणी घटल्याने सात महिन्यांत सोने 10,887 रुपये स्वस्त; 56 हजारांचा टप्पा गाठून 45 हजारांपर्यंत घट

March 3, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.