दैनिक स्थैर्य | दि. २ एप्रिल २०२४ | फलटण |
कृषि विभाग फलटणच्या तालुका कृषी अधिकारीपदी दत्तात्रय गायकवाड रूजू झाले आहेत.
तालुका कृषि अधिकारी खंडाळा श्री. गजानन ननावरे यांच्याकडे फलटणचा अतिरिक्त पदभार होता.
दत्तात्रय गायकवाड यांनी यापूर्वी कृषि अधिकारीपदी बारामती, जिल्हा पुणे येथे काम केले आहे. पदोन्नतीने फलटण येथे तालुका कृषी अधिकारीपदी रूजू झाले त्याबद्दल फलटणच्या कृषी विभागाचे अधिकारी व कर्माचारी यांनी त्याचे स्वागत केले.