जैन सोशल ग्रुप आयोजित ‘दांडिया नु धमाका’ कार्यक्रम उत्साहात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
नवरात्रीनिमित्त जैन सोशल ग्रुप फलटणमार्फत महाराजा मंगल कार्यालयात दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगिनी फोरम व युवा फोरम या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा ‘दांडिया नु धमाका’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अरिहंत टी.व्ही.एस. व कनकवंदना हॉस्पीटलने हा कार्यक्रम प्रायोजित केला होता.विजेत्यांना अरिहंत टी.व्ही.एस. सौजन्याने मंगेश दोशी व सौ. पूजा दोशी यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आल्या.

महावीर ग्रुप व लिमीट लेस ग्रुप यांना बेस्ट ग्रुप डान्स ट्रॉफी देण्यात आली. तसेच बेस्ट कपल, बेस्ट सोलो मेल-फिमेल, बेस्ट ड्रेपरी मेल-फिमेल अशा ट्रॉफीज विजेत्यांना मंगेश दोशी, नमिता शहा, जैन सोशल ग्रुप अध्यक्ष सौ. सविता दोशी, पूजा दोशी, सचिन शहा, समीर शहा यांच्या हस्ते देण्यात आल्या.

कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जेएसजीएमआरसी मास्टर शेफ कमिटी सदस्या नमिता शहा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेशशेठ दोशी, कनकवंदना हॉस्पिटलचे डॉ. अलोक गांधी, डॉ. शिल्पा गांधी, जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सविता दोशी, उपाध्यक्ष श्रीपाल जैन, सहसचिव पूजा भूता, खजिनदार समीर शहा, संचालक राजेंद्र कोठारी, डॉ. मिलिंद दोशी, सचिन शहा, हर्षद गांधी, अतुल कोठाडिया, नीना कोठारी, डॉ. सूर्यकांत दोशी, संगिनी फोरम अध्यक्षा अपर्णा जैन व पदाधिकारी, युवा फोरम अध्यक्ष तेजस शहा व सहकारी बहुसंख्य जैन सोशल ग्रुप सदस्य, श्रावक-श्राविका, युवक-युवती व स्पर्धक उपस्थित होते.

यावेळी सर्वांनी दांडियाचा आनंद घेतला. उपस्थितांसाठी फूड स्टॉलची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन स्मिता शहा व मनिषा घडिया यांनी केले.

दांडिया कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिव प्रीतम शहा, सचिन शहा, राजेंद्र कोठारी, डॉ. मिलींद दोशी, खजिनदार समीर शहा, संगिनी फोरम व युवा फोरम सदस्य यांचे सहकार्य लाभले.


Back to top button
Don`t copy text!