```html
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
```

कच्च्या तेलाच्या किमती ७० डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता: एंजल ब्रोकिंग

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई, दि.१९: आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख लंडन तसेच अमेरिकेच्या बाजारातील खनिज तेलाच्या किंमती येत्या कालावधीत अधिक उंचावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ब्रेंट प्रकारच्या खनिज तेलाचे दर प्रति पिंप ७० डॉलपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ब्रेंट आणि डब्ल्यूटीआय तेलाच्या किंमतीनी ८ फेब्रुवारी ते ५ मे २०२१ या कालावधीत अधिकच्या १० डॉलरने व्यापक श्रेणीत व्यापार केला. एमसीएक्स फ्युचर्समध्ये याच कालावधीत तेलाचे दर भारतीय चलनामध्ये ४,२०० ते ५,००० रुपये प्रति पिंप या श्रेणीत व्यापार करत होते.

डॉलर कमकुवत झाल्याने अमेरिका, चीन आणि युरोपमध्ये मागणी वाढण्याची शक्यता तसेच अमेरिकेतील तेलसाठ्यात घट, अमेरिकेतील रिफायनरी उपयोग दरात वाढ, चीनच्या तेल आयातीत वाढ, अमेरिका आणि चीनमधील लसीकरण हे सध्या काळ्या सोन्यासाठी प्रोत्साहनपर घटक ठरत आहे. तसेच भारत, ब्राझील आणि जपानमध्ये कोरोना विषाणूच्या केसेस वाढत असतानाही तेलाच्या जागतिक मागणीत वाढीचे संकेत असल्यामुळे मे ते जुलैदरम्यान, ओपेक, रशिया आणि सदस्य राष्ट्रे तेल उत्पादनावरील निर्बंध टप्प्या टप्प्याने शिथील करतील असे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केले.

जागतिक हेज फंड मॅनेजर्समधील आशावाद तेलाच्या किंमती वाढण्यासही प्रोत्साहन देतात. इराण आणि ओपेक देशांकडून वाढता तेलपुरवठा हा तेलाच्या किंमतीतील संभाव्या वाढीसाठी अडथळा ठरू शकतो ही चिंतेची बाब आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआय तेलाचे दर (६४ डॉलर प्रति पिंप) एका महिन्याच्या दृष्टीकोनातून ७० डॉलर/ प्रति बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तर एमसीएक्स ऑइल फ्युचर्स (४,७८८ रुपये प्रति पिंप) त्याच कालावधीत ५१००/ प्रति पिंप प्रतिदिन पर्यंत कमी होण्याची शक्यता असल्याचे श्री माल्या यांनी सांगितले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!