
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२२ । सातारा । विवाहितेचा जाचहाट करण्यात आला. याप्रकरणी पती, सासूसह पाचजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. ३ मे २0२१ ते दि. ९ जुलै २0२२ दरम्यान माहेरहून सोन्याचे दागिने घेवून ये, असे म्हणून शिवीगाळ, मारहाण करणाऱ्या पती सोमनाथ ऋषमुख हंपे, सासू सुमन ऋषमुख हंपे, दीर सदाशिव ऋषमुख हंपे, नणंद संजीवनी व भाग्यश्री ऋषमुख हंपे सर्व रा. सच्चिदानंद बंगला, वनश्रीनगर, तळेगाव दाभाडे, पुणे यांच्याविरोधात सौ. ज्योति सोमनाथ हंपे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पो. हवालदार गायकवाड हे करीत आहेत.
