
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. 30 : अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सबंधित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संबंधित महिला ही मजुरी काम करते. राजा श्रीरंग वाघे वय 25 रा. कासेगाव, ता. वाळवा, सांगली याने तिच्या मुलीस पळवून नेले आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार बर्गे करत आहेत.
